global privacy policy (marathi)

शेवटचे अद्यतनित केले: January 21, 2022

Choreograph हा एक जागतिक डेटा आणि तंत्रज्ञान व्यवसाय असून त्यांच्या उत्पादने आणि सेवांच्या श्रेणींमध्ये असणाऱ्या ग्राहकांना विविध प्रकारचे डेटा-ड्रिव्हन मार्केटिंग सोल्युशन्स त्यांच्याकडून प्रदान केले जातात. आम्ही एक WPP कंपनी असून, GroupM तंत्रज्ञान आणि उत्पादनांचा विशेषकरून वापर करणाऱ्या WPP नेटवर्कमधील GroupM आणि त्यांच्या एजन्सींसह अन्य कंपन्यांसोबत जवळून काम करतो. WPP आणि GroupM बाबत अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा

आम्ही कशाप्रकारे तुमची वैयक्तिक माहिती संकलित करू आणि हाताळू शकतो (काही वेळेस याला ‘वैयक्तिक डेटा’ किंवा ‘व्यक्तिगत ओळख पटण्यायोग्य माहिती’) याच्या माहितीसह तुम्हाला म्हणजेच ग्राहकाला प्रदान करणे हे या गोपनीयता धोरणाचे उद्दिष्ट आहे. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन वैयक्तिक माहिती जी आमच्या ग्राहक प्राधान्य पोर्टलवर स्पष्ट करण्यात आली आहे, यांचा समावेश होतो.

हे एक जागतिक गोपनीयता धोरण आहे. जर तुम्ही हे धोरण EU मधून ॲक्सेस करत असाल, तर कृपया UK, EEA आणि स्वित्झर्लंडमधील व्यक्तींचे गोपनीयता अधिकार यांबाबतचा विभाग वाचा. जर तुम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असाल, तर कृपया कॅलिफोर्नियामधील व्यक्तींचे गोपनीयता अधिकार यांबाबतचा विभाग वाचा.

इतर गोपनीयता धोरणे

हे गोपनीयता धोरण www.choreograph.com वरून Choreograph ची वेबसाईट वापरत असताना संकलित केलेल्या वैयक्तिक माहितीस सामावून घेत नाही. याबाबतची माहिती येथे मिळू शकते

जर तुम्हाला सेवाप्रवेश प्रक्रियेमध्ये तुमची वैयक्तिक माहिती कशाप्रकारे वापरली गेली आहे याबाबत जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सेवाप्रवेश गोपनीयता धोरण येथे मिळवू शकता

आम्ही तुम्हाला संपूर्ण गोपनीयता धोरण वाचण्यासाठी प्रोत्साहित करतो, असे असले तरीही, जर तुम्ही कंटेंट्सचा वापर करण्यास प्राधान्य देत असाल तर खाली दिलेल्या लिंक्स तुम्हाला स्वतंत्र विभागांकडे नेतील:

***

आमच्या सेवा

या विभागात आम्ही आमच्या क्लायंट्सना ज्या सेवा देऊ करतो, त्यांची माहिती देण्यात आली आहे. आमचे ‘क्लायंट्स’ हे व्यवसाय असून, जे ग्राहकांशी थेट व्यवहार करतात, जसे जाहिरातदार जे त्यांची उत्पादने आणि सेवा यांची विक्री ग्राहकांना करतात. आम्ही आमच्या सेवा थेट ग्राहकांना देऊ करत नाही. आम्ही थेट क्लायंट्ससोबत किंवा एजंट्सच्या माध्यमातून (जसे डेटा किंवा माध्यमे खरेदी करणारे एजंट) काम करतो, जे क्लायंट्सच्या वतीने काम करतात.

आमचे क्लायंट्स त्यांच्या ग्राहकांना प्रभावी आणि संबंधित जाहिरात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देता यावी, यासाठी आमच्या सेवा वापरतात. आम्ही जाहिरातदारांना त्यांच्या विद्यमान ग्राहकांचे स्वारस्य, पसंतीक्रम आणि गरजा समजून घेण्यासाठी मदत करतो तसेच सर्व माध्यम वाहिन्यांमध्ये नवे संभाव्य ग्राहक शोधण्यासाठीही मदत करतो. आमच्या सेवा क्लायंट्सना त्यांच्या विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांबाबत एक एकीकृत आणि साकल्यपूर्ण दृष्टिकोन देतात आणि जे ग्राहक त्यांची उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींमध्ये स्वारस्य ठेवून असतात, त्यांना जाहिरात सेवा देऊ करण्यास अनुमती देतात.

आमच्या ‘सेवा’ स्थूलमानाने कृतींच्या तीन श्रेणींमध्ये परिभाषित केल्या जाऊ शकतात: सिंक, कंपोज आणि परफॉर्म, जे पुढे आणखी विशद केले आहे.

सिंक… कंपोज… पार पाडा…
डेटा ऑनबोर्डिंग डेटा एनरिचमेंट प्लॅनिंग
डेटा हायजिन इनसाईट्स ॲक्टिव्हेटिंग
डेटा जुळणी मॉडेलिंग मेजरिंग आणि रिपोर्टिंग
आयडी रिझॉल्यूशन सेगमेंटिंग
प्रोफाईलिंग
सिम्युलेटिंग

वर सूचीबद्ध केलेल्या प्रत्येक सेवेसाठी, कृपया प्रक्रिया करण्याचे उद्देश पहा

आमची तंत्रज्ञाने आणि उत्पादने

आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही वापरत असलेली तंत्रज्ञाने आणि उत्पादने यांचा आढावा खाली दिला आहे.

सेवेचे नाव सेवेचा तपशील
आयडी ग्राफ आयडी ग्राफद्वारे लोक, ठिकाणे आणि कृती यांच्यातील संबंध आणि नाते शोधण्यासाठी ग्राफ टेक्नॉलॉजी आणि मशिन लर्निंगचा वापर केला जातो. हे एखाद्या ग्राहक किंवा कुटुंबासंबंधी (जसे ग्राहक तपशील, मानसरेखन, स्वारस्य, खरेदीविषयक वर्तन, स्वास्थ्य सूक्ष्मदृष्टी (इनसाईट्स) इत्यादी.) असलेल्या गुणवैशिष्ट्यांचा सर्वंकष संच प्रदान करण्यासाठी प्रथम आणि तृतीय पक्ष डेटा साधनांना एकत्र करून ग्राहकांच्या ओळखीचा एक साकल्यपूर्ण दृष्टिकोन प्रदान करते. हे Choreograph ला डेटा जुळवणी, आयडी रिझोल्युशन, ग्राहक इनसाईट्स, एनरिचमेंट, मॉडेलिंग आणि सेगमेंटिंग सेवा प्रदान करण्यास अनुमती देते.
आयडी ग्राफ नेटवर्क (IDN) आयडेंटिटी ग्राफ नेटवर्क हे आयडेंटिटी ग्राफचे मूलतत्त्व आहे. हे आलेखामध्ये भरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या डेटा ॲसेट्सशी संदर्भित करत असून, त्यात क्लायंट फर्स्ट पार्टी डेटा, थर्ड पार्टी लायसन्स्ड डेटा तसेच Choreograph च्या स्वामित्वविषयक डेटा ॲसेट्स, ज्याबाबत पुढे वर्णन करण्यात आले आहे, त्यात यांचा समावेश होतो: ऑडियन्स ओरिजिन; i-Behaviour, (संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंग्डम), Conexance (फ्रान्स), AmeriLINK (संयुक्त राज्य अमेरिका), आणि mPlatform (जागतिक).
ऑडियन्स ओरिजिन ऑडियन्स ओरिजिन हे आमचे त्रैमासिक ग्राहक सर्वेक्षण असून, जागतिक स्तरावर आमच्या विश्वासार्ह पॅनेल प्रदात्यांकडून केले जाते. आम्ही ग्राहकांना त्यांचे माध्यमांबाबतचे वर्तन, श्रेणीवार खरेदी, माध्यम स्पर्शबिंदू, मानसरेखन, ग्राहक तपशील याबाबत ग्राहकांना अनेक सुयोग्य असे प्रश्न विचारतो, ज्यातून त्यांच्या प्रेरणा, वर्तन आणि दृष्टिकोन काय आहेत, हे उत्तमरित्या समजून घेता येते. सर्वेक्षणाचे प्रतिसाद एकत्रित (किंवा समुच्चयित) केले जातात ज्यातून सामान्य ग्राहक दृष्टिकोन तसेच माध्यम नियोजन आणि खरेदीहेतू हे समजता येते. काही बाबतींमध्ये, आम्हाला वैयक्तिक प्रतिसाद स्तरावरील डेटादेखील मिळतो, जो मॉडेलिंग आणि कार्यान्वयनसाठी वापरला जातो.
फ्युजन फ्युजनद्वारे ऑडियन्स ओरिजिनकडून तसेच mPlatform आणि अन्य परवानाधारक थर्ड-पार्टी डेटा स्त्रोतांकडील संकलित केलेल्या सर्वेक्षण डेटाचा वापर करून आपल्या क्लायंट्साठी डेटा एनरिचमेंट आणि डेटा मॅचिंग सेवा प्रदान करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
स्ट्रॅटेजी सिम्युलेटर आमचे स्ट्रॅटेजी सिम्युलेटर हे ग्राहकांचे वर्तन आणि बाजारपेठेच्या गतिशीलतेमुळे क्लायंट्सच्या व्यवसायावर होणाऱ्या बदलांचा परिणाम यांची प्रतिकृती तयार करते किंवा त्याबाबतचा अंदाज वर्तवते, ते ऑडियन्स ओरिजिनमधून संकलित केलेल्या सर्वेक्षणातील कृत्रिम समष्टीचा वापर करून साध्य केले जाते. यामुळे आमच्या क्लायंट्सना त्यांची माध्यमविषयक खरेदी दूरदर्शी विचार पद्धतीने नियोजित करण्यात सहाय्य होते.
iBehaviour (संयुक्त राज्य अमेरिका आणि कॅनडा) iBehaviour हा संयुक्त राज्य अमेरिका आणि कॅनडातील एक सहकारी तत्त्वावरील डेटाबेस असून, त्यामध्ये सहकारितेतील सदस्य अन्य सदस्यांना लाभ होण्यासाठी किंवा त्यांच्या वापरासाठी त्यांच्या ग्राहकांच्या B2B आणि B2C माहितीचे योगदान देतात. या माहितीमध्ये वैयक्तिक माहिती जसे की नाव,पत्ता, ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक यांच्यासह वस्तू आणि सेवांची खरेदी, व्यवहाराचे मूल्य, व्यवहाराची तारीख, इत्यादी. यांसारख्या व्यवहार/खरेदीची माहिती यांचा समावेश होतो. जेव्हा आमच्या क्लायंट्सचे ग्राहक काही खरेदी करतात, एखाद्या वेबसाईटवर नोंदणी करतात  किंवा अन्य कोणतही मार्ग अनुसरतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती त्रयस्थ पक्षासोबत जसे Choreograph सामायिक केली जाण्यास मान्यता देतात, तेव्हा हा डेटा आमचे क्लायंट्स थेट ग्राहकांकडून संकलित करतात. सहकारितेमध्ये दिलेल्या माहितीच्या योगदानाचा सदस्यांना ग्राहकांच्या त्यांच्या आधीच्या खरेदीचे वर्तन, त्याचसोबत जीवनशैली, भौगोलिक आणि लोकसंख्यात्मक माहिती यांच्या आधारे ग्राहकांसाठी जाहिरात (ऑनलाईन आणि ऑफलाईन) करण्यास अनुमती देते.  सहकारितेच्या माध्यमातून, Choreograph सदस्यांना मॉडेलिंग सेवा (नवे संभाव्य ग्राहक शोधण्यासाठी), पुनःसक्रियन आणि अनुकूलतमीकरण सेवा (सुटलेल्या ग्राहकांना पुन्हा जोडण्यासाठी), आणि डेटा एनरिचमेंट (सदस्यांच्या विद्यमान ग्राहकांच्या फाईल्सना डेटा व्हेरिएबल्स जोडणे) देऊ केले जाते.
Conexance (फ्रान्स)iBehaviour (युनायटेड किंग्डम) Conexance आणि iBehaviour हे आमचे अनुक्रमे फ्रान्स आणि युनायटेड किंग्डममधील सहकारी डेटाबेस आहेत. वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करून खालील सेवा प्रदान करण्यासाठी, सदस्यांच्या वतीनेकेल्या जाणाऱ्या विनंतीवरून काम करणारे, GDPR च्या अंतर्गत असणारे Choreograph हे एक डेटा प्रोसेसर आहे:  मॉडेलिंग सेवा (नवे संभाव्य ग्राहक शोधणे), पुनःसक्रियन आणि अनुकूलतमीकरण सेवा (सुटलेल्या ग्राहकांना पुन्हा जोडण्यासाठी), आणि डेटा एनरिचमेंट (सदस्यांच्या विद्यमान ग्राहकांच्या फाईल्सना डेटा व्हेरिएबल्स जोडणे). यामुळे सदस्यांना त्यांच्या विपणनाच्या मोहिमा पोस्ट, ई-मेल्स, एसएमएस किंवा ऑनलाईन पद्धतीने चालवता येतात.
AmeriLINK (संयुक्त राज्य अमेरिका) AmeriLINK हा संयुक्त राज्य अमेरिकेतील आमचा स्वामित्व अधिकार असलेला ग्राहक डेटाबेस असून, तो ग्राहक आणि कौटुंबिक माहिती ज्यात ग्राहक तपशील आणि मानसरेखन डेटा, स्वास्थ्य आणि कल्याण डेटा, जीवनविषयक घटनांचा डेटा, व्यवहारात्मक/खरेदी डेटा, दृष्टिकोनात्मक डेटा आणि वित्तीय निर्देशक यांचा समावेश होतो, त्याबाबतची माहिती संकलित करतो, साठवतो आणि त्याची क्रमवार मांडणी करतो. आमच्या ग्राहक डेटाबेसचा वापर करून, Choreograph द्वारे AmeriLINK च्या क्लायंट्सना मॉडेलिंग सेवा, ज्यात लूक-अ-लाईक मॉडेलिंग, डेटा एनरिचमेंट सेवा (क्लायंट्सच्या विद्यमान ग्राहकांच्या फाईलला डेटा व्हेरिएबल्स जोडणे), डेटा हायजिन सेवा (जसे की पत्त्याचे मानकीकरण, सप्रेशन) समावेश असून त्या प्रदान केल्या जातात. आम्ही कॅलिफोर्निया आणि व्हरमाँटमध्ये डेटा ब्रोकर म्हणून नोंदणीकृत आहोत.
AmeriLINK ॲक्टिव्हेट ॲक्टिव्हेट हे Choreograph च्या ॲक्टिव्हेशन चॅनेल्सपैकी एक आहे. क्लायंट्स स्वयं-सेवेसाठी म्हणून किंवा व्यवस्थापित सेवेसाठी म्हणून ॲक्टिव्हेट वापरू शकतात, ज्यातून क्लायंट्सना फर्स्ट पार्टी डेटा प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची अनुमती मिळते, अतिरिक्त थर्ड पार्टी परवाने आणि स्वमालकी हक्काच्या डेटापर्यंत पोहोचता येते आणि ऑनलाईन ॲक्टिव्हेशनसाठी ऑडियन्सना DSP आणि सोशल चॅनेल्सवर पुश करता येते.
mPlatform [m]PLATFORM हे एक श्रोतृवर्ग बुद्धिमापन सोल्यूशन आहे, जे आवश्यक प्रमाणात वैयक्तिकृत ग्राहक संबंध निर्माण करू शकते. हे माध्यम वापर वर्तनाचा डेटा गोळा करते, जेणेकरून Choreograph ला ग्राहकांचे स्वारस्य, प्राधान्य आणि जीवनशैली याबाबत सूक्ष्मदृष्टी (इनसाईट्स) प्राप्त होऊ शकेल आणि ग्राहक प्रोफाईल्स तयार करता येतील. या टूलचा वापर आम्ही आमच्या क्लायंट्सना ग्राहकांविषयीची सूक्ष्मदृष्टी प्रदान करण्यासाठी करतो तसेच मॉडेलिंगसाठी (लूक-अ-लाईक मॉडेलिंगसह) करतो. mPlatform हा एक ॲक्टिव्हेशन प्लॅटफॉर्मदेखील असून तो आम्हाला ऑडियन्सना ॲक्टिव्हेशनसाठी DSP कडे पुश करण्यास अनुमती देतो.  mPlatform बाबत अधिक माहितीसाठी, येथे पहा.
Proteus Proteus हे माध्यमविषयक खरेदीतून आवश्यक प्रमाणात प्रोग्रॅमॅटिक डेटावर प्रक्रिया करते. आमच्या सर्व एजन्सींच्या प्रोग्रामॅटिक कार्यवाहीच्या लॉग-स्तरीय डेटाचे अंतर्ग्रहण, जुळवणी आणि सामान्यीकरण करते, जे आम्हाला मॉडेलिंग, सूक्ष्मदृष्टी (इनसाईट्स), माध्यम नियोजन, मोहीम वार्तांकन यांसारख्या सेवा आमच्या क्लायंट्सना देण्याची अनुमती देते.

आम्ही संकलित करत असलेली माहिती

आमच्या सेवा पुरवताना, आम्ही विविध प्रकारची माहिती संकलित करतो आणि वापरतो, ज्यात वैयक्तिक माहितीचाही समावेश होतो:

आयडेंटिफायर्स (“IDs”).

 • ऑफलाईन IDs मध्ये पूर्ण नाव, दूरध्वनी क्रमांक यांचा समावेश होतो;
 • ऑनलाईन IDs मध्ये ई-मेल ॲड्रेस, आयपी ॲड्रेस, कूकी आयडी, डिव्हाईस आयडी, यामध्ये मोबाईल ॲडव्हर्टायझिंग आयडी (MAIDs), जसे की Apple चे “IDFA” आणि Google चा ॲडव्हर्टायझिंग आयडी यांचा समावेश होतो;
 • Choreograph चे स्वामित्वविषयक आयडी(ज) जे एकमेव प्रकारे निश्चित केलेले ग्राहक जे त्यांच्या स्वतःच्या आयडेंटिटी एन्व्हायर्नमेंटमध्ये आहेत, यात “K-LINK”, “ChoreoID”, “[mP]ID” यांचा समावेश होतो; आणि
 • त्रयस्थ पक्षाकडून आपल्याला प्राप्त होणारे अन्य IDs, ज्यात सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांचे सर्वेक्षण किंवा पॅनेल आयडी किंवा त्रयस्थ पक्ष ऑनबोर्डिंग भागीदारांचे आयडी यांचा समावेश होतो.

व्यवहार आणि खरेदी डेटा यामध्ये उत्पादन श्रेणी (उदा. दागिने, वस्त्र प्रावरणे, पाळीव प्राणी, प्रवास, क्रीडा) आणि खरेदीचा तपशील (उदा. ऑर्डर्सची संख्या, खर्चलेले मूल्य, पेमेंटचा प्रकार, खरेदीची पद्धत) यांचा समावेश होतो. आम्ही बँक तपशील, क्रेडिट कार्ड तपशील किंवा अन्य वित्तीय खातेस्तरीय तपशील संकलित करत नाही. ग्राहकाद्वारे एखादा ब्रँड किंवा उत्पादन खरेदी केले जाण्याची संभाव्यता किंवा “प्रवृत्ती”, याबाबतच्या प्रारूपबद्ध व्यवहार डेटाचाही उपयोग आम्ही करतो.

डिव्हाईस आणि ब्राऊझर माहिती यामध्ये ब्राऊझर आणि त्याचे व्हर्जन, ब्राऊझर भाषा, ऑपरेटिंग सिस्टिम आणि कनेक्शन प्रकार (उदा. वायर्ड किंवा वायफाय) समाविष्ट असते.

ऑनलाईन ॲक्टिव्हिटी माहिती यामध्ये पेज यूआरएल (पेज यूआरएलची श्रेणी), साईट/पेज जिथून ग्राहक जाहिरात पाहण्याआधी येतो, ऑनलाईन ॲक्टिव्हिटीची तारीख आणि वेळ, एखाद्या साईटला भेट देण्याची वारंवारता, साईटवर सर्चसाठी वापरलेल्या संज्ञा, जाहिरातीसोबतचे आदान-प्रदान (उदा. तुम्ही जाहिरातीवर क्लिक केले किंवा नाही) समाविष्ट असते.

जनसांख्यिकीय माहिती यामध्ये वय, लिंग, उत्पन्न, वैवाहिक स्थिती, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण, वांशिक पार्श्वभूमी समाविष्ट असते.

मानसरेखन माहिती यामध्ये स्वारस्य, जीवनशैली, वृत्ती, व्यक्तिमत्त्वे हे समाविष्ट असते.

लोकेशन डेटा यामध्ये टपाल पत्ता, आयपी ॲड्रेस (जो देश, प्रांत किंवा पोस्ट कोड/झिप कोड स्तराच्या लोकेशन डेटामध्ये रुपांतरित केलेला असतो) आणि मालमत्ता/घरे यांचा अक्षांश/रेखांश डेटा (संयुक्त राज्य अमेरिकेमधील) समाविष्ट असतो.

वर सूचीबद्ध सेवा देऊ केल्या जातात, त्या सर्वच क्षेत्रांत वरील सर्व जमा केलेली माहिती वापरली जात नाही. जर आम्ही तुमची कोणती वैयक्तिक माहिती धारण केली आहे, जाणून घेऊ इच्छित असाल, तर कृपया आमच्या ग्राहक प्राधान्य पोर्टलचा वापर करा.

या माहितीचा आम्ही कसा वापर करतो

खाली दिलेल्या सारणीत आमच्या सेवा प्रदान करताना, वेगवेगळ्या पद्धतींची माहिती आम्ही कशाप्रकारे वापरतो, याचे विवरण दिले आहे. या उद्देशांपैकी प्रत्येकाच्या वर्णनासाठी, कृपया प्रक्रिया करण्याचे उद्देश या विभागामध्ये आणखी तपशील पहा. खाली निश्चित केलेल्या उद्देशांच्या व्यतिरिक्त, आमच्या कायदेशीर अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी फसवणूक शोधणे किंवा प्रतिबंधित करणे यांसाठी आम्ही संकलित करत असलेली सर्वच माहिती किंवा तिचे संयोजन वापरू शकतो.

सिंक

माहितीचा प्रकार आम्ही ही माहिती कशाप्रकारे वापरतो
डेटा ऑनबोर्डिंग डेटा हायजिन डेटा जुळणी आयडी रिझॉल्यूशन
संपूर्ण नाव
टपालाचा पत्ता
ईमेल पत्ता
फोन क्रमांक
ऑनलाईन IDs मध्ये आयपी ॲड्रेस, कूकी आयडी, डिव्हाईस आयडी यांसह.
सर्वेक्षण किंवा पॅनेल आयडी ✓ (सप्रेशन)
सर्वेक्षण प्रतिसाद
खरेदी आणि व्यवहार डेटा
डिव्हाईस आणि ब्राऊझर माहिती
ऑनलाईन ॲक्टिव्हिटी माहिती
लोकेशन माहिती

कंपोज

माहितीचा प्रकार आम्ही ही माहिती कशाप्रकारे वापरतो
डेटा एनरिचमेंट इनसाईट्स मॉडेलिंग सेगमेंटिंग प्रोफाईलिंग सिम्युलेटिंग
संपूर्ण नाव
टपालाचा पत्ता
ईमेल पत्ता
फोन क्रमांक
ऑनलाईन IDs मध्ये आयपी ॲड्रेस, कूकी आयडी, डिव्हाईस आयडी यांसह.
सर्वेक्षण किंवा पॅनेल आयडी
सर्वेक्षण प्रतिसाद
खरेदी आणि व्यवहार डेटा
डिव्हाईस आणि ब्राऊझर माहिती
ऑनलाईन ॲक्टिव्हिटी माहिती
लोकेशन माहिती

परफॉर्म

माहितीचा प्रकार आम्ही ही माहिती कशाप्रकारे वापरतो
प्लॅनिंग ॲक्टिव्हेटिंग मेजरिंग आणि रिपोर्टिंग
संपूर्ण नाव
टपालाचा पत्ता
ईमेल पत्ता
फोन क्रमांक
ऑनलाईन IDs मध्ये आयपी ॲड्रेस, कूकी आयडी, डिव्हाईस आयडी यांसह.
सर्वेक्षण किंवा पॅनेल आयडी
सर्वेक्षण प्रतिसाद
खरेदी आणि व्यवहार डेटा
डिव्हाईस आणि ब्राऊझर माहिती
ऑनलाईन ॲक्टिव्हिटी माहिती
लोकेशन माहिती

प्रक्रिया करण्याचे उद्देश

सेवा प्रक्रिया करण्याचे उद्देश उद्देशांचे वर्णन
सिंक डेटा ऑनबोर्डिंग क्लायंटचा डेटा Choreograph च्या डेटा एन्व्हायर्नमेंटमध्ये किंवा थर्ड-पार्टी होस्टेड क्लीन रूम एन्व्हायर्नमेंटमध्ये आणणे.थर्ड-पार्टी लायसन्स्ड डेटा Choreograph च्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्सवर आणणे.
डेटा हायजिन मर्ज/पर्ज, ॲड्रेस प्रमाणीकरण आणि सप्रेशन यांसोबतच क्लायंटच्या डेटाचे क्लिनिंग करणे.
डेटा जुळणी क्लायंटचा डेटा ग्राहकांच्या Choreograph च्या स्वामित्वहक्क असणाऱ्या डेटाबेसमध्ये असणाऱ्या डेटाशी जुळवून पाहणे.ऑफलाईनवरून ऑनलाईन डेटा, जसे की ऑफलाईन संकलित केलेला डेटा (उदा. नाव, टपाल पत्ता इ.) तुमच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीशी किंवा ऑनलाईन आयडीशी (उदा. डिव्हाईस आयडी, कूकी आयडी इ.) जुळवून पाहणे.दोन किंवा अधिक डिव्हाईसेस एकाच वापरकर्ता किंवा कुटुंबाद्वारे वापरली जात आहेत का हे निर्धारित करण्यासाठी विविध डिव्हाईसेसवर जुळवून पाहणे.
आयडी रिझॉल्यूशन ज्ञात आणि अज्ञात ग्राहकांमध्ये क्लायंटच्या मालकीचा एकच ग्राहक व्ह्यू तयार करणे.Choreograph च्या स्वामित्वहक्क आयडीसह, ग्राहकांना एकमेव स्वरूपाचा आयडी निश्चित करुन देणे.
कंपोज डेटा एनरिचमेंट Choreograph च्या स्वामित्वहक्क डेटाबेसमधून ग्राहक डेटा जोडून (किंवा लावून) क्लायंट डेटा वर्धित करणे.
इनसाईट्स ग्राहकांचे स्वारस्य, प्रेरणा, वर्तन आणि प्राधान्य याबाबत सूक्ष्मदृष्टी (इनसाईट्स) समजून घेण्यासाठी डेटा संकलनाचा उपयोग करणे. हे वैयक्तिक ग्राहक स्तरावर असू शकते किंवा सामुदायिक गट किंवा लोकसंख्या स्तरावर असू शकते.
मॉडेलिंग प्रतिकृती (किंवा “नियमांचा” संच) तयार करणे जे ग्राहकांच्या वर्तनाचे भाकीत वर्तवू शकतात किंवा सारख्या ग्राहकांची गुणवैशिष्ट्ये वर्णन करू शकतात.
सेगमेंटिंग जे समान किंवा एकसारखे गुणविशेष, परिस्थिती, गरजा किंवा प्राधान्ये प्रत्यक्ष किंवा अनुमानित माहितीवरून सामायिक करतात अशा ग्राहकांचा एक गट (काही वेळेस त्यास सेगमेंट, ऑडियन्स किंवा लिस्ट्स म्हटले जाते) तयार करणे.
प्रोफाईलिंग ग्राहकांचे त्यांच्या समान गुणधर्म, वर्तन आणि/किंवा लोकसंख्येच्या आधारावरून लेबलिंग करणे किंवा वर्णन करणे, याचा वापर मॉडेलिंग,सेगमेन्टिंग आणि ॲक्टिव्हेटिंगमध्ये होतो.
सिम्युलेटिंग क्लायंट डेटा आणि Choreograph डेटाचा वापर करून लोकसंख्येच्या वर्तनास सिम्युलेट करून विपणनाच्या संभाव्य परिणामांची चाचणी घेणे.
परफॉर्म प्लॅनिंग ऑटोमेटेड टूल्सच्या वापरासह सर्व मार्गांवरील माध्यमे विकत घेण्याचे नियोजन करणे
ॲक्टिव्हेटिंग ऑनलाईन जाहिरातीकरता माध्यम खरेदी आणि सोशल प्लॅटफॉर्म्ससाठी ऑडियन्स डिलिव्हर करणे.ऑफलाईन जाहिरातीसाठी (उदा. टपाल, फोन) क्लायंट्स किंवा तृतीय पक्ष पूर्तता गृहांकडे लिस्ट्स डिलिव्हर करणे.
मेजरिंग आणि रिपोर्टिंग जाहिरात मोहिमेच्या कार्यप्रदर्शनाचे मापन आणि वार्तांकन

माहितीचे स्रोत

आम्हाला विविध प्रकारच्या स्रोतांकडून माहिती मिळते, ज्यात यांचा समावेश आहे:

 • आमच्या क्लायंट्सकडून, जे त्यांचा डेटा आमच्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड करण्यासाठी आमच्या सेवा वापरू शकतात आणि क्लायंट्सच्या वेब आणि ॲपला भेट देणाऱ्या ग्राहकांकडून डेटा संकलित करण्यासाठी आमच्या कूकीज आणि पिक्सेल्स वापरू शकतात. आम्ही वापरतो त्या कूकीजच्या अधिक माहितीसाठी, कृपया कूकीज हा विभाग पहा.
 • थेट आमच्या ग्राहकांकडून, यामध्ये आमच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यास मान्यता देणारे ग्राहक आणि वेब आणि ॲप गुणधर्मांवर कूकीज, पिक्सेल्स किंवा अन्य सारख्याच ऑनलाईन तंत्राचा वापर करणे हे समाविष्ट आहे. आम्ही वापरतो त्या कूकीजच्या अधिक माहितीसाठी, कृपया कूकीज हा विभाग पहा.
 • आमच्या व्यवसायाच्या विविध भागांकडून उदाहरणार्थ, आमच्या सहकार व्यवसायातील आमच्या सदस्यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती आम्ही घेतो. (i-Behaviour आणि Conexance) आणि ही माहिती सामान्य उत्पादन श्रेणींमध्ये म्हणजेच उदा. “महिलांचा पोशाख”, आणि “रिसेन्सी”, “फ्रिक्वेन्सी” आणि “मॉनेटरी” मेट्रिक्स जसे महिलांच्या पोशाखांच्या मागणीची अखेरची तारीख, गेल्या 12 महिन्यांमधील महिलांच्या पोशाखांसाठीच्या मागण्या, एकूण खर्च केलेली रक्कम आणि गेल्या 12 महिन्यांत महिलांच्या कपड्यांवर खर्च झालेली एकूण रक्कम इ. यामध्ये रूपांतरित केली जाते.
 • सार्वजनिक नोंदींमधून, काही विशिष्ट देशांमध्ये जिथे हे उपलब्ध असेल तिथून जसे की, व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक परवाने (उदा. मासेमारीचे परवाने), टपालाच्या नोंदी, (पत्त्यांच्या प्रमाणीकरणासाठी), सप्रेशन लिस्ट्स (उदा. डू नॉट कॉल रजिस्ट्री) आणि जनगणनेच्या नोंदी.
 • आमच्या विश्वासार्ह तृतीय पक्ष भागीदारांकडून. यातील काही भागीदार हे विविध स्रोतांकडून आलेला डेटा संकलित करतात.

कूकीज

यामध्ये आमच्या क्लायंटच्या वेब प्रॉपर्टीजला किंवा आमच्या क्लायंट्सच्या जाहिरातींवर दिसणाऱ्या वेब प्रॉपर्टीजना भेट देताना तुमच्या ब्राऊझरमध्ये ठेवल्या जाऊ शकणाऱ्या कुकीज समाविष्ट असतात. कूकीजसाठी आम्ही आमची कॉर्पोरेट वेबसाईट वापरतो, कृपया आमचे वेबसाईट धोरण पहा.

कूकी ही एक अल्फान्यूमेरिक टेक्स्ट फाईल असून, ती ब्राऊझरमध्ये वेबसाईटद्वारे किंवा तृतीय पक्ष जाहिरात सर्व्हर किंवा अन्य तृतीय पक्षाद्वारे साठविली जाते, ज्यामुळे त्या वेबसाईट किंवा तृतीय पक्षाला त्या ब्राऊझरचे स्मरण करण्यास आणि ग्राहकाबाबत काही माहिती स्मृतीत ठेवण्यास अनुमती देतो. आमच्या टार्गेटिंग कूकीजना “मूकीज” असे म्हटले जाते आणि त्या आमचे डोमेन mookie1.com मध्ये कार्यान्वित होतात. त्या दीर्घस्थायी कूकीज (याचा अर्थ असा की, त्या जोवर मृत पावत नाहीत किंवा यूजरकडून डिलिट केल्या जात नाहीत किंवा रिमूव्ह केल्या जात नाहीत, तोवर त्या साठवलेल्या राहतात) असा असून, त्यांच्यात एकमेव अशी यादृच्छिकपणे तयार केलेली मूल्ये असतात, जी आमच्या सेवेस ब्राऊझर्स आणि डिव्हाईसेस यांच्यात फरक करण्यास सक्षम करतात आणि एखाद्या यूजरच्या काही विशिष्ट माहितीशी संबंधित असतात. मूकी कूकीज, एकत्रितपणे या वापरकर्त्यांच्या माहितीशी संबंधित असतात, त्या आमच्या सेवांची कार्यक्षमतेसाठी वापरल्या जातात, यात स्वारस्य आधारित जाहिरातींचा समावेश होतो.

खालील सारणीत आमच्या मूकी कूकीजबद्दल माहिती देण्यात आली आहे.

कूकीचे नाव कूकी वर्तणूक क्षमता कूकीमध्ये राखलेली माहिती अंतिम रिफ्रेशपासूनची कालबाह्यता (दिवसांत)
लक्ष्यीकरण (क्लायंट डेटा) लक्ष्यीकरण आणि अनुकूलतमीकरण (वापरकर्ता डेटा) विशेषता आणि सुरक्षेचे रिपोर्टिंग
id Y Y Y युनिक अनुक्रमांक 395 दिवस
ov N N Y युनिक आयडेंटिफायर 395 दिवस
mdata Y N N युनिक अनुक्रमांक, निर्मिती टाइमस्टँप, कूकी आवृत्ती 395 दिवस
syncdata_<PARTNER> Y N N युनिक अनुक्रमांक, निर्मिती टाइमस्टँप, डेटा पार्टनरचा व्हिजिटर आयडी 10 दिवस

ॲप एन्व्हायर्नमेंटमध्ये, तुमच्या डिव्हाईसला एक ॲडव्हर्टायझिंग आयडी (कूकी आयडीपेक्षा वेगळा) निश्चित करून दिला जाईल. हा एक अल्फान्यूमेरिक आयडेंटिफायर असून, तो एक प्लॅटफॉर्म किंवा ऑपरेटिंग सिस्टिम (जसे की Apple iOS किंवा Google Android) द्वारे उपलब्ध केला जाईल, ते ॲप्लिकेशन डेव्हलपर आणि तृतीय पक्षाला ॲप्लिकेशन एन्व्हायर्नमेंटमध्ये एखादे विशिष्ट डिव्हाईस ओळखण्यास आणि एखाद्या ग्राहकाशी संबंधित माहिती ओळखण्यास अनुमती देईल. ॲडव्हर्टायझिंग आयडीच्या उदाहरणांमध्ये मोबाईल ॲडव्हर्टायझिंग आयडी (MAIDs), Apple च्या “IDFA”आणि Google च्या ॲडव्हर्टायझिंग आयडीचा समावेश होतो. यूजर माहितीसोबत एक ॲडव्हर्टायझिंग आयडी आमच्या सेवांच्या कार्यक्षमतेत त्याचे संकलन वापरले जाते, यात स्वारस्य आधारित जाहिरातीचाही समावेश होतो.

आम्ही माहिती शेअर कशी करतो

आमच्या सेवांच्या तरतुदीसाठी माहिती शेअर करणे

क्लायंट्स: आमच्या क्लायंट्सना (किंवा क्लायंट्सच्या वतीने काम करणाऱ्या एजंट्सना) सेवा देण्यासाठी आम्ही या गोपनीयतेच्या सूचनेमध्ये वर्णन केलेली माहिती वापरतो, त्यामध्ये शेअर करणे, परवाना देणे किंवा आमच्या क्लायंट्सना माहिती ॲक्सेस करण्यासाठी अनुमती देणे यांचा समावेश असू शकतो. आमच्या सहकारी डेटाबेससाठी (i-Behaviour आणि Conexance) आम्ही सहकारातील सहभागी सदस्यांमध्ये, तसेच Choreograph व्यवसायाच्या इतर विभागांना माहिती शेअर करतो (आम्ही आमचा व्यवसायाच्या इतर भागांमधून माहिती कशी मिळवतो याचे वर्णन करणारा माहितीचे स्त्रोत हा विभाग पहा).

अंतर्गत कंपन्यांचा समूह: आम्ही आमच्या WPP आणि GroupM या कंपन्यांच्या समूहासोबत आणि त्यांच्या Mindshare, MediaCom, Wavemaker, Essence, m/SIX, Xaxis, Finecast आणि CMI यांचा समावेश असलेल्या एजन्सीजसोबतदेखील अंतर्गतरित्या माहिती शेअर करतो.

सेवा प्रदाते: आम्ही सेवांच्या तरतुदीसाठी आमच्या आणि/किंवा आमच्या क्लायंट्सच्या वतीने सेवा आणि कार्ये पार पाडणाऱ्या तृतीय-पक्ष प्रदात्यांसहदेखील माहिती शेअर करतो. उदाहरणार्थ, ॲडव्हर्टायझिंगच्या डिलिव्हरीसोबत डिमांड-साइड प्लॅटफॉर्म्स, ॲडव्हर्टायझिंग नेटवर्क, ॲडव्हर्टायझिंग एक्सचेंज आणि ॲड सर्व्हर यांच्यासाठी जबाबदार असलेल्या कंपन्या, तसेच ऑफलाईन मार्केटिंग मोहिमांसाठी पूर्तता गृहे, तंत्रज्ञान किंवा ग्राहक सहाय्य, ऑपरेशन्स, वेब किंवा डेटा होस्टिंग/स्टोरेज, बिलिंग, अकाउंटिंग, सुरक्षा, मार्केटिंग, डेटा व्यवस्थापन, प्रमाणीकरण, सुधारणा किंवा स्वच्छता किंवा अन्यथा आमची सेवा आणि उत्पादने पुरवण्यासाठी आम्हाला सहाय्य करणारे प्रदाता आम्हाला विकसित करणे, देखरेख करणे आणि सुधारणे यासाठी मदत करतात.

कायदेशीर उद्देशांसाठी माहिती शेअर करणे:

आम्ही तृतीय पक्षांसह (कायदे अंमलबजावणी, लेखा परीक्षक आणि नियामकांसह) वैयक्तिक माहिती शेअर करू शकतो:

 • कायदेशीर प्रक्रिया किंवा नियामक तपासणीचे पालन करणे (उदा. साक्षी समन्स किंवा न्यायालयीन आदेश)
 • आमच्या सेवेच्या अटी, हे गोपनीयता धोरण किंवा तुमच्यासोबत असलेले इतर करार त्यांच्या संभाव्य उल्लंघनांच्या तपासणीसह अंमलबजावणी करणे
 • तृतीय पक्षांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास अशा दाव्यांना प्रतिसाद देणे
 • आमचे, आमच्या प्लॅटफॉर्मचे, आमच्या ग्राहकांचे, आमच्या एजंट्सचे आणि सहयोगींचे, त्यांच्या वापरकर्त्यांचे आणि/किंवा जनतेचे हक्क, मालमत्ता किंवा वैयक्तिक सुरक्षितता यांचे संरक्षण करणे. त्याचप्रमाणे आम्ही फसवणुकीपासून संरक्षण आणि स्पॅम/मालवेअर प्रतिबंध आणि तत्सम उद्देशांसाठी इतर कंपन्यांना आणि संस्थांना (कायद्याच्या अंमलबजावणीसह) माहिती पुरवू शकतो.

कॉर्पोरेट उद्देशांसाठी माहिती शेअर करणे

नियंत्रण बदलल्यास डेटाचे हस्तांतरण: आम्हाला किंवा आमच्या व्यवसायातील सर्व मालमत्ता किंवा मोठ्या प्रमाणातील मालमत्ता, दुसऱ्या कंपनीद्वारे/सोबतचे एकत्रीकरण, विलिनीकरण, मालमत्ता खरेदी किंवा इतर व्यवहार अशा कोणत्याही प्रकारे विकत घेतल्यास, आमच्याकडे असलेली किंवा आम्हाला विकत घेणाऱ्या पक्षाकडे असलेली माहिती अशी सर्व माहिती (“संपर्क साधा” या पेजवर दिलेल्या आपण पुरवलेली कोणतीही माहितीदेखील) हस्तांतरित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो आणि विकत घेणारा पक्ष कदाचित त्यांच्या व्यवसायासाठी या माहितीचा वापर करू शकतो.

कॉर्पोरेट व्यवहारात माहिती शेअर करणे:मोठ्या कॉर्पोरेट व्यवहाराच्या बाबतीत, आम्ही अशा व्यवहारांशी संबंधित वैयक्तिक माहितीदेखील उदाहरणार्थ, विलीनीकरण, गुंतवणूक, संपादन, पुनर्रचना, एकत्रीकरण, दिवाळखोरी, परिसमापन किंवा आमच्या काही किंवा सर्व मालमत्तांची विक्री,  किंवा अशा कोणत्याही व्यवहाराशी संबंधित योग्य कार्यतत्परता साधण्याच्या हेतूने शेअर करू शकतो.

डेटा संरक्षण

ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याचाच अर्थ असा की, डेटावर होणाऱ्या अतिक्रमणापासून या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही विशेष काळजी घेतो आणि आमच्या सुरक्षेच्या उपायांकडे विशेष लक्ष पुरवतो. अनधिकृतपणे माहिती मिळवणे, ती राखून ठेवणे आणि उघड करणे अशा गोष्टींपासून संरक्षण मिळण्यासाठी आम्ही औद्योगिक मानकांचे पालन करतो. माहितीची सुसंगती, प्राप्तीचे मार्ग आणि तिचा वापर सुरक्षित ठेवण्यासाठी वस्तुरूप, इलेक्ट्रॉनिक आणि व्यवस्थापन प्रक्रियांचा यात समावेश असतो.

Choreograph सर्वसमावेशक डेटा सुरक्षा प्रोग्रॅमचे महत्त्व ओळखते, तसेच आम्ही प्रक्रिया करत असलेला डेटा अचूक आणि सुरक्षितपणे राखला जात आहे याची खात्री करण्याची गरज देखील ओळखते. आमच्याकडे असलेल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तांत्रिक, संस्थात्मक आणि प्रशासकीय सुरक्षा उपायांचा वापर करतो. आमच्या डेटाचा अनधिकृत वापर किंवा त्यातील फेरफार यापासून बचाव करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक फायरवॉल संरक्षण, काटेकोर नियंत्रित ॲक्सेस आणि इतर सुरक्षा उपायांच्या संयोजनाद्वारे बहुस्तरीय सुरक्षिततेचा वापर करतो.

वैयक्तिक माहितीचे आंतरराष्ट्रीय हस्तांतरण

Choreograph ही एक जागतिक कंपनी आहे आणि ती अनेक प्रदेश व देशांमधील ग्राहकांना आपल्या सेवा पुरवते.

जिथे शक्य असेल तिथे आम्ही वैयक्तिक माहिती स्थानिक पातळीवर साठवतो, उदाहरणार्थ, EU (EMEA आणि UK साठी), तैवान, सिंगापूर आणि चीन (APAC साठी) आणि US (उत्तर अमेरिकेसाठी), ग्राहकाच्या स्थानानुसार हे ठरते.

तरीही, खालील परिस्थितींमध्ये या स्थानांव्यतिरिक्त इतर ठिकाणी वैयक्तिक माहिती हस्तांतरित करण्याची आवश्यकता आम्हाला भासू शकते:

 • जेव्हा आम्हाला आमचा डेटा संग्रहित केलेल्या स्थानाव्यतिरिक्त आमच्या ग्राहकांकडे किंवा आमच्या सेवा प्रदात्यांकडे अन्य ठिकाणी माहितीचे हस्तांतरण करण्याची आवश्यकता असते, त्यावेळी;
 • जेव्हा आमच्या अभियांत्रिकी किंवा सहाय्यक गटांना आमच्या सिस्टिमची आणि प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यासाठी, त्यांची देखरेख करण्यासाठी आणि/किंवा त्यांचे नियंत्रण करण्यासाठी असलेली स्थानाबाहेरील वैयक्तिक माहिती (रिमोट ॲक्सेससह) “ॲक्सेस करण्याची” आवश्यकता असते, त्यावेळी.
 • जेव्हा आमच्याकडे वेगवेगळ्या स्थानी असू शकणारी, सेवा पुरवणारी संयुक्तपणे कार्यरत किंवा क्रॉस एजन्सी टीम असते आणि विविध स्थानांवरून वैयक्तिक माहिती मिळवणे आवश्यक असते, त्यावेळी;

जेव्हा आम्ही ही आंतरराष्ट्रीय हस्तांतरणे करतो, तेव्हा ती लागू होणाऱ्या सर्व स्थानिक डेटाचे संरक्षण आणि गोपनीयता कायद्यांचे पालन करत असल्याची आम्ही खात्री करून घेतो.

औद्योगिक संघटनांचे सदस्यत्व

Choreograph ही इंटरनेट-आधारित जाहिरातींच्या संदर्भात ग्राहकांच्या ऑनलाईन गोपनीयतेशी संबंधित धोरणांचे नियंत्रण करणाऱ्या औद्योगिक संघटनांमधील एक सक्रिय सदस्य आहे, यामध्ये: नेटवर्क ॲडव्हर्टायझिंग इनिशिएटिव्ह (NAI), डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अलायन्स (DAA), युरोपियन डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अलायन्स (eDAA) आणि IAB ट्रान्स्परन्सी आणि कंसेट फ्रेमवर्क (IAB TCF) यांचा समावेश होतो. Choreograph द्वारे NAI आचारसंहिता, DAA स्वयं-नियामक तत्त्वे आणि IAB TCF धोरणांचे पालन केले जाते. हे नियम आणि तत्त्वे ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करतात, असा आमचा विश्वास आहे.

NAI आणि DAA निवड रद्द करण्याच्या यंत्रणेद्वारे तुमचे गोपनीयता अधिकार कसे वापरायचे याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या ग्राहक प्राधान्य पोर्टल ला भेट द्या.

स्वास्थ्य सेगमेंट्सचा वापर करून स्वारस्य-आधारित जाहिरातींमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या डिजिटल जाहिरात उद्योगाच्या प्रयत्नांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो. स्वास्थ्यसंबंधित माहितीवरील प्रमाणित आणि सानुकूल स्वारस्य सेगमेंट्सविषयी किंवा स्वारस्य-आधारित जाहिरातींच्या उद्देशांसाठी आम्ही ज्या स्वारस्यांचा वापर करतो त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे पहा.

ग्राहक प्राधान्य पोर्टल

आमच्या क्लायंटसाठी गोपनीयता प्राधान्यकृत सोल्युशन्स पुरवण्यासाठी आणि आमच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या डिझाइनमध्ये गोपनीयता स्थापित करण्यासाठी Choreograph वचनबद्ध आहे. तुमची वैयक्तिक माहिती कशी वापरली जाते याविषयी आम्ही घेतलेल्या निर्णयांचे नियंत्रण तुम्हाला घेता आले पाहिजे हे आम्हाला जाणवते. हे प्राधान्य केंद्र तुम्हाला गोपनीयतेच्या नियमांतर्गत तुमचे अधिकार वापरण्यासाठी एक सोपी, पारदर्शक प्रक्रिया पुरवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी आम्ही तुम्हाला शक्य तितकी जास्तीत जास्त माहिती देऊ इच्छितो. या पोर्टलद्वारे अनेक पद्धतींनी तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर करू शकता. तुम्ही राहता त्या देशानुसार आणि आम्ही तुमच्याबद्दल कोणता डेटा ठेवतो यावर त्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून असतील.

आम्ही आमच्या ग्राहकांना पुरवत असलेल्या सेवांच्या स्वरूपामुळे आम्ही तुमचा ऑनलाइन डेटा आणि तुमचा ऑफलाइन डेटा वेगळ्या पद्धतीने हाताळतो. आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या सेवांवरील गोपनीयता धोरणाचा विभाग वाचा. हे ग्राहक प्राधान्य पोर्टल तुमचे अधिकार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही डेटाच्या संबंधात बजावण्यासाठी वापरले जाऊ शकते. आम्ही तुमच्या विनंतीला शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत, ते तुमच्या देशातील गोपनीयता कायद्यांतर्गत आवश्यक असलेल्या कालमर्यादेवर अवलंबून असेल.

तुमची डिजिटल माहिती

आम्ही तुमचा डिजिटल डेटा कसा वापरतो हे नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी वापरकर्त्यास अनुकूल स्वरूपाचे पोर्टल तयार केले आहे. आम्ही तुमच्याविषयीचा हा डेटा ऑनलाईन संकलित करतो आणि त्यात ऑनलाईन आयडी, डिव्हाईस आणि ब्राऊझरची माहिती, ऑनलाईन ॲक्टिव्हिटीची माहिती आणि लोकेशन डेटा यांचा समावेश असू शकतो (या प्रकारच्या डेटाच्या वर्णनासाठी विभाग x पहा). आम्ही आमच्या सर्व सेवा, सर्व क्षेत्रांमध्ये पुरवत नसल्यामुळे आम्ही संकलित करत असलेल्या डिजिटल डेटाचा प्रकार तुमच्या स्थानानुसार बदलू शकतो. तुमच्याविषयीचा कोणता डिजिटल डेटा आमच्याकडे आहे आणि तुम्ही तुमचा डिजिटल डेटा कसा व्यवस्थापित करू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

तरीही, जर तुम्ही चीनमध्ये असाल तर कृपया तुमचा डेटा व्यवस्थापित करण्यासाठी आणि तुमचे अधिकार वापरण्यासाठी privacy@choreograph.com वर ईमेल करा.

तुमचा ऑफलाईन डेटा

तुमच्या डिजिटल माहितीच्या पलीकडे तुमच्याबद्दल आमच्याकडे असलेला अतिरिक्त डेटा समजून घेण्यासाठी खालील फॉर्म वापरता येऊ शकतात, यामध्ये तुमचे नाव, टेलिफोन क्रमांक आणि पत्ता यासारखे तुमचे वैयक्तिक तपशील यांचा समावेश असू शकतो. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमच्या सर्व सेवा पुरवत नसल्यामुळे आम्ही संकलित करत असलेल्या डिजिटल डेटाचा प्रकार तुमच्या स्थानानुसार बदलू शकतो. तुमच्याविषयीचा कोणता ऑफलाईन डेटा आमच्याकडे आहे आणि तुम्ही तुमचा ऑफलाईन डेटा कसा व्यवस्थापित करू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

तुमच्या ओळख पडताळणीसाठी आम्ही तुमची माहिती कशी वापरतो

डेटा रिलीज करण्यापूर्वी आम्ही तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुमचा फोटो आयडी मागू शकतो, हे आम्ही केवळ तुम्हाला तुमची माहिती पुरवत आहोत याची खात्री करून घेण्यासाठी आणि तृतीय-पक्षाच्या अनधिकृत ॲक्सेसपासून तिचे संरक्षण करण्यासाठी करतो. आमच्या कोणत्याही सेवांमध्ये किंवा तुमच्या ओळखीची पडताळणी करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी आम्ही तुमची ओळख सामायिक करणार किंवा वापरणार नाही.

तुमचे अधिकार वापरण्याचे इतर मार्ग

ब्राऊझर प्रणालींमध्ये तुम्ही खालील पद्धतींचा वापर करून कुकीज नाकारू किंवा काढून टाकू शकता:

 • तुमच्या ब्राऊझर सेटिंग्जमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून कुकीज नाकारण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी तुमची ब्राऊझर सेटिंग्ज समायोजित करणे. हे कसे करायचे याबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे
 • वेबसाईट मालकाच्या स्तरावरून कुकी सेटिंग्ज समायोजित करणे. वेबसाईटच्या मालकानुसार सेटिंगचे हे पर्याय बदलू शकतात.
 • वेब एन्व्हायर्नमेंट्ससाठी डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अलायन्सच्या (DAA) “YourAdChoices” प्रोग्रॅमद्वारे स्वारस्य-आधारित जाहिरातींची निवड करणे, येथे उपलब्ध आहे:
  – संयुक्त राज्य अमेरिकेसाठी – https://aboutcookies.orgaboutads.info/choices/
  – कॅनडासाठी – https://youradchoices.ca/en/tools
  – युरोप आणि युनायटेड किंग्डमसाठी – https://youronlinechoices.com/ (तुमचे स्थान निवडल्यानंतर “Your ad choices” लिंकवर क्लिक करून)

तुम्ही खालील पद्धतींद्वारे तुमच्या जाहिरात आयडीशी कनेक्ट केलेल्या मोबाईल आणि ओव्हर द टॉप (OTT) TV डिव्हाईस ॲपवरील जाहिरात ट्रॅकिंग मर्यादित करू शकता.

 • तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर आणि/किंवा तुमच्या OTT TV डिव्हाईसवरील गोपनीयता सेटिंगमध्ये जाऊन आणि लागू होणाऱ्या जाहिरात आयडीद्वारे स्वारस्य-आधारित जाहिराती थांबवण्यासाठी “Limit Ad Tracking” सिलेक्ट करून. टीप: तुम्ही तुमच्या डिव्हाईसद्वारे स्वारस्य-आधारित जाहिरातींची निवड रद्द करण्यासाठी अधिक प्रभावी आणि अद्ययावत पद्धतींसाठी तुमच्या डिव्हाईस निर्मात्यांद्वारे दिलेल्या सूचनांवर विचारविनिमय करावा.
 • ॲप एन्व्हायर्नमेंट्ससाठी डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अलायन्सच्या (DAA) “YourAdChoices” प्रोग्रॅमद्वारे स्वारस्य-आधारित जाहिरातींची निवड करणे, येथे उपलब्ध आहे:
  – संयुक्त राज्य अमेरिकेसाठी – https://youradchoices.com/control
  – कॅनडासाठी – https://youradchoices.ca/en/tools

UK, EEA आणि स्वित्झर्लंडमधील व्यक्तींचे गोपनीयता अधिकार

तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीला ॲक्सेस करण्याचा, अपडेट करण्याचा, बदलण्याचा, हटवण्याचा, त्याचा वापर प्रतिबंधित करण्याचा किंवा तुम्हाला सहज वाचता येईल अशा स्वरूपात त्याची प्रत मिळवण्याचा अधिकार आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये Choreograph ने तुमची वैयक्तिक माहिती तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही विनंती करू शकता आणि मार्केटिंग उद्देशांसाठी तिचा वापर करण्याबद्दल आक्षेप घेण्याचा अधिकारदेखील तुम्हाला आहे. जिथे तुमच्या वैयक्तिक माहितीवरील प्रक्रिया ही तुमच्या संमतीवर आधारित असते, अशा बाबतीत ही संमती कधीही मागे घेण्याचाही अधिकार तुम्हाला आहे. कृपया लक्षात घ्या की संमती मागे घेण्यापूर्वीच्या तुमच्या वैयक्तिक माहितीवरील आमच्या प्रक्रियेच्या विधिपूर्णतेवर संमती मागे घेतल्यामुळे परिणाम होणार नाही.

तुम्हाला यापैकी कोणतेही अधिकार वापरायचे असल्यास कृपया आमचे ग्राहक प्राधान्य पोर्टल वापरा किंवा आम्हाला privacy@choreograph.com वर ईमेल करा.

आम्ही ज्याप्रकारे तुमची वैयक्तिक माहिती हाताळली त्याबाबत तुम्ही समाधानी नसल्यास, तुम्हाला पर्यवेक्षी प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचादेखील अधिकार आहे.

कॅलिफोर्नियामधील व्यक्तींचे गोपनीयता अधिकार

येथे पहा.

जागतिक वापरकर्त्यांचे गोपनीयता हक्क

भविष्यातील प्रक्रियेची निवड रद्द करण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती हटवण्याची विनंती करण्यासाठी तुमच्या प्रदेशाची पर्वा न करता आम्ही आमच्या ग्राहक प्राधान्य पोर्टलद्वारे सर्व ग्राहकांना सक्षम करण्यासाठी एक कार्यतंत्र पुरविलेले आहे. या अधिकारांचा वापर कसा करायचा याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी privacy@choreograph.com वर संपर्क साधा.

तक्रार कशी करावी

तुमच्या काही तक्रारी असल्यास किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू इच्छित असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा विभाग वापरा आणि आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कशी संकलित करतो आणि कशी हाताळतो याबद्दल तुमच्या कोणत्याही तक्रारी किंवा चिंतांचे निराकरण करण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.

कोणत्याही कारणास्तव जर आम्ही तुमच्या समस्यांचे योग्य निराकरण केले आहे असे तुम्हाला वाटत नसेल, तर तुम्ही तुमच्या अधिकारक्षेत्रात लागू होणाऱ्या डेटा संरक्षण प्राधिकरण किंवा पर्यवेक्षी प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता आणि औपचारिक तक्रार दाखल करू शकता.

आमच्याशी संपर्क साधा

आम्ही या गोपनीयता धोरणामध्ये शक्य तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर कृपया आमच्याशी privacy@choreograph.com वर संपर्क साधा किंवा तुम्ही ग्राहक प्राधान्य पोर्टलद्वारे तुमचे अधिकार वापरू शकता.

युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) आणि स्वित्झर्लंडमध्ये Choreograph ने संकलित केलेल्या डेटासाठी Choreograph Limited ही Choreograph ची कायदेशीर संस्था जबाबदार आहे. EEA आणि स्वित्झर्लंडच्या बाहेरील क्षेत्रांसाठी Choreograph LLC ही जबाबदार कायदेशीर संस्था आहे. तुम्ही EEA किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहणारी व्यक्ती असाल, तर तुम्ही आमच्या DPO शी dpo@Choreograph.com वर संपर्क साधू शकता.

जर तुम्हाला या धोरणाबद्दल प्रश्न, टिप्पण्या किंवा समस्या असतील, तर तुम्ही ईमेल किंवा टपालाच्या माध्यमातून आमच्यासोबत संवाद साधू शकता:

युरोप:
Choreograph Limited
DPO@choreograph.com
Choreograph, सी कंटेनर्स, 18 अप्पर ग्राउंड, लंडन, SE1 9PT– Attn: डेटा संरक्षण अधिकारी

युरोपच्या बाहेर:
Choreograph LLC
Privacy@choreograph.com
Choreograph, 3 वर्ल्ड ट्रेड सेंटर, 175 ग्रीनविच स्ट्रीट, न्यूयॉर्क, NY, 10007, USA – Attn: गोपनीयतेचे संचालक

धोरणातील बदल

कृपया लक्षात घ्या की, गोपनीयता कायदे आणि नियम, डिजिटल तंत्रज्ञान आणि आमचा व्यवसाय यांच्या बदलत्या स्वरूपामुळे, आम्ही वेळोवेळी या गोपनीयता धोरणात बदल करू शकतो. कोणतेही बदल जाणून घेण्यासाठी कृपया या गोपनीयता धोरणाचे अधूनमधून पुनरावलोकन करा (बदल केव्हा केले गेले आहेत हे कळण्यासाठी आम्ही पेजच्या वरच्या बाजूला तो दिनांक अद्यतनित करू).

परिशिष्ट A आरोग्य-संबंधित विभाग

प्रेक्षक वर्णन
असंवेदनशील संवेदनशील
ठणका व वेदना ADHD/ADD
पुरळ ADHD/ADD औषधे
ॲलर्जी सारखे बहुधा अल्झायमर
ॲलर्जी व सायनस नैराश्य दूर करणारे औषध
ॲलर्जीची औषधे चिंता
ॲलर्जी ग्रस्त ध्यान अभाव विकार
आर्टिरिओस्लेरोसिस द्विध्रुवीय
संधिवात स्तनाचा कर्करोग
संधिवात औषधे कर्करोग
अस्थमा मोठ्या आतड्याचा कर्करोग
अस्थमा औषधे नैराश्य
ॲथलीटस् फूट नपुंसकता
पाठदुखी प्रोस्टेट कर्करोग
मूत्राशय समस्या
सीमारेषेवरील मधुमेह
स्तन परीक्षा
ब्राँकायटिस
घरातील काळजीवाहक
कार्पल टनेल
मोतीबिंदू
दीर्घकालीन ब्राँकायटिस
दीर्घकालीन वेदना
सर्दीचे फोड
योग्यरीत्या लेन्स लावणारे
कोंडा
दाताचे विकार
दाताच्या समस्या
दात
मधुमेह
मधुमेह – आहार/व्यायाम उपचार
मधुमेह – इन्शुलिन उपचार
मधुमेह – मौखिक औषधे
मधुमेह – इतर उपचार पध्दती
मधुमेह – टाइप 2/ प्रौढ सुरूवात
आहार वर्तन
पचनाचे आजार
पचनाची स्थिती
कोरडे डोळे
इसब
व्यायाम
फ्लू शॉट
अन्न ॲलर्जी
पायाचे आजार
वारंवार डॉक्टरांच्या भेटी
गॅस/पोट भरलेले राहणे
GERD/ॲसिड रिफ्लक्स
हिरड्यांना आलेली सूज
काचबिंदू
ग्लुकोफेज औषध
केस गळती
डोकेदुखी
आरोग्याचा स्कोअर – कमी
निरोगी वर्तन बदल – शक्यता
निरोगी वर्तन बदल – टिकून राहणे
श्रवणयंत्र
श्रवणशक्ती कमी होणे
हृदयाची स्थिती
छातीमध्ये जळजळ औषधे
छातीत जळजळ/ॲसिड अपचन ग्रस्त
मूळव्याध
उच्च रक्तदाब
उच्च BMI
उच्च कोलेस्टेरॉल
उच्च कोलेस्टेरॉल – आहार/व्यायाम
उच्च कोलेस्टेरॉल – लिहून दिलेली औषधे
उच्च कोलेस्टेरॉल आणि रक्त दाब
इमिट्रेक्स औषध
निद्रानाश
सांधे/मणक्याचे आजार
मूत्रपिंडाचा आजार
मूत्रपिंडाच्या समस्या
लॅक्टोज असहिष्णुता
लेझर दृष्टी सुधारणा
लिपिटर औषध
मॅमोग्राम
वैद्यकीय पेमेंट अडचण
मेडिकेअरचा फायदा
मेडिकेअर सप्लिमेंट
मायग्रेन
गतिशीलता समस्या व सहाय्य
तोंड व दात
अनेक चिकित्सक
नखातील बुरशी
नाकातील ॲलर्जी
आरोग्य विमा नाही
डॉक्टर नाही
अलीकडील तपासणी नाही
लठ्ठपणा
ऑस्टियोऑर्थरायटिस
ऑस्टिओपोरोसिस
एकूणच आरोग्य – कमी
वेदना
शारीरिक आरोग्य – खराब
न्यूमोनिया लस
प्रोस्टेट विकार
PSA चाचणी
सोरियासिस
धूम्रपान सोडणे
श्वसनाविषयी
ऱ्हुमेटॉइड ऑर्थरायटिस
जोखमीचे आरोग्य वर्तन
वण
सीटबेल्ट
सायनुसायटिस
त्वचा
त्वचेची खाज किंवा पुरळ
झोप
धूम्रपान करणारा
मल चाचणी
टेटॅनस इंजेक्शन
लघवी/आतडी
दृष्टी विकार
दृष्टी काळजी व अटी
वजन
वजन कमी होणे
चाकाची खुर्ची

परिशिष्ट B मधील खंड हे राजकीय संलग्नीकरणावर आधारित आहेत

प्रेक्षक वर्णन
राजकीय संलग्नीकरण: लोकशाहीवादी
राजकीय संलग्नीकरण: गणराज्यवादी
राजकीय संलग्नीकरण: स्वतंत्र

the forrester wave report – q2 2022