0
1
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0
0
1
2
3
4
5
6
7
8
9
%

website policy (marathi)

शेवटचे अद्यतनित केले: January 21, 2022

Select language

तुमच्याकडून आमच्या वेबसाईटचा वापर होत असताना काही प्रसंगी आम्ही तुमचे नाव आणि (ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि पोस्टल पत्ता इ.) संपर्क तपशील संकलित करू शकतो. आम्ही ही माहिती संमतीशिवाय संकलित करणार नाही आणि ती कधीही ऑनलाइन जाहिरातींच्या नियोजनात वापरणार नाही. तुम्ही स्वेच्छेने तुमचे नाव आणि संपर्क तपशील देऊ शकता अशा उदाहरणांमध्ये हे समाविष्ट आहे:

विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी: आम्ही केवळ वापरकर्त्याच्या विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी ईमेल पत्ता आणि इतर संपर्क माहिती अशा माहितीची नोंद ठेवतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही “आमच्याशी संपर्क साधा” लिंकवर क्लिक केल्यास आणि प्रश्न किंवा टिप्पणी सबमिट केल्यास, तुम्हाला उत्तर पाठवण्यासाठी आम्ही तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि फोन क्रमांक संकलित करू.

जर तुम्ही स्वेच्छेने आमच्या न्यूजलेटर सूचीमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असाल, तर तुम्हाला आमचे ईमेल न्यूजलेटर पाठवण्यासाठी आम्ही तुमचा ई-मेल पत्ता संकलित करू.

वर नमूद केल्याप्रमाणे तुमची संपर्क माहिती प्रविष्ट करून तुम्ही तुमच्या विनंतीसंदर्भात तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी Choreograph ला संमती देत आहात. ही संमती म्हणजेच या माहितीस या प्रकारे वापरण्यासाठीचा आमचा कायदेशीर आधार आहे.

कोणत्याही वेळी तुम्ही तुमची संमती मागे घेण्याचा निर्णय घेतल्यास आणि आम्ही तुम्हाला आमच्या मार्केटिंग ई-मेल किंवा न्यूजलेटरसूचीतून वगळावे असे वाटत असल्यास किंवा आमच्या डेटाबेसमधून सदस्यता रद्द करू इच्छित असाल, तर तुम्ही जागतिक गोपनीयता सूचनेमधील आमच्याशी संपर्क साधा विभागातील तपशील वापरून आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल पत्ता आणि तुम्ही विनंती करत असलेल्या बदलांबाबतच्या स्पष्ट सूचना समाविष्ट कराव्या लागतील. ई-मेलच्या तळाशी असलेल्या “अनसबस्क्राईब” लिंकवर क्लिक करूनदेखील तुम्ही ई-मेल न्यूजलेटरची सदस्यता रद्द करू शकता.

जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देता किंवा आम्हाला संपर्क माहिती पुरविता, तेव्हा Choreograph तुमच्या (लागू कायद्याद्वारे ही संज्ञा किंवा तत्सम संज्ञा परिभाषित केली गेल्यामुळे) वैयक्तिक डेटासाठी जबाबदार डेटा कंट्रोलर असते.

भविष्यातील भेटींमध्ये तुम्ही प्राधान्य दिलेला कंटेंट उपलब्ध करून तुमचा वेबसाईट अनुभव सुधारण्यासाठी आम्ही या माहितीचा काही भाग किंवा संपूर्ण माहिती वापरतो. या प्रकारच्या प्रक्रियेसाठी आमचा कायदेशीर आधार हा आहे की, आमच्या वेबसाईटवरील तुमचा अनुभव समजून घेण्यात आणि सुधारण्यात आम्हाला वैध स्वारस्य आहे.

जर आम्ही कुकीज आणि वरील माहिती वापरणे तुम्हाला मान्य नसेल, तर तुम्ही तुमच्या ब्राऊझर सेटिंग्जद्वारे त्यांचा वापर प्रतिबंधित करू शकता किंवा तुम्ही येथे निवड रद्द करू शकता. कुकीज न स्वीकारणे निवडल्यास, काही वेबसाईट वैशिष्ट्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करणार नाहीत.

कूकीज काय आहेत?

कुकीज या थोडीशी माहिती साठविलेल्या टेक्स्ट फाईल्स असतात, ज्या तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देता, तेव्हा आम्ही तुमच्या संगणकावर किंवा डिव्हाईसवर डाऊनलोड करून ठेवतो. त्यानंतरच्या भेटींमध्ये आम्ही या कुकीज ओळखू शकतो आणि त्यांच्यामुळे आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू शकतो. कुकीज अनेक प्रकारच्या असतात आणि आम्ही तुम्हाला या साइटवर सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कुकीजचे प्रकार आणि श्रेण्यांबाबत पुढील तपशील पुरवितो.

फर्स्ट आणि थर्ड-पार्टी कुकीज – कुकी ही फर्स्ट-पार्टी असो किंवा थर्ड-पार्टी असो, ती त्या कुकीला ठेवणाऱ्या डोमेनला संदर्भित करते. फर्स्ट-पार्टी कुकीज या वापरकर्त्याद्वारे भेट दिलेल्या वेबसाईटने म्हणजेच URL विंडोमध्ये दिसणाऱ्या वेबसाईटद्वारे सेट केल्या जातात, उदा: https://www.choreograph.com. थर्ड-पार्टी कुकीज या अशा कुकीज असतात ज्या वापरकर्त्याने भेट दिलेल्या वेबसाईटव्यतिरिक्त अन्य डोमेनद्वारे सेट केल्या जातात. जर एखाद्या वापरकर्त्याने एका वेबसाईटला भेट दिली आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून अन्य एंटीटी कुकी सेट करत असेल, तर ती थर्ड-पार्टी कुकी असेल.

सेशन कुकी – या कुकीज वेबसाईट ऑपरेटर्सना ब्राऊझर सेशनच्या दरम्यान वापरकर्त्याच्या कृतींचा दुवा साधण्याची अनुमती देतात. जेव्हा वापरकर्ता ब्राऊझर विंडो उघडतो आणि ब्राऊझर विंडो बंद करतो, तेव्हा ब्राऊझर सेशन सुरू होतो. सेशन कुकीज तात्पुरत्या तयार केल्या जातात. एकदा का तुम्ही ब्राऊझर बंद केला की, सर्व सेशन कुकीज हटविल्या जातात.

आपण कुकीज कशासाठी वापरतो?

कुकीज खाली दिल्यानुसार एक किंवा अधिक श्रेणींमध्ये वर्गीकृत होतात. ही वेबसाईट वेळोवेळी सर्व श्रेणींत वर्गीकृत होणाऱ्या कुकीज वापरते. तसेच, जेव्हा तुम्ही इतर वेबसाईट्सना भेट दिली असेल, तेव्हा आम्ही तृतीय पक्षांद्वारे तुमच्या कॉम्प्युटरवर ठेवलेल्या लक्ष्यित कुकीजमधील डेटा वापरतो.

मी कुकीज कशा हटवू शकतो?

तुम्ही तुमच्या संगणकावर किंवा डिव्हाईसवर आधीपासून असलेल्या कुकीज हटवू इच्छित असल्यास, कृपया खालील तपशील पहा. अतिरिक्त तपशील कुकीप्राधान्य केंद्र यामध्ये उपलब्ध आहे, जे या साईटवर वापरल्या जाणाऱ्या सर्व कुकीज प्रदर्शित करेल. तुम्हाला भविष्यात तुमच्या कॉम्प्युटरवर कुकीज स्टोअर करणे थांबवायचे असल्यास, कृपया तुमच्या ब्राऊझर मेनूमधील “हेल्प” वर क्लिक करून तुमच्या ब्राऊझर निर्मात्याच्या सूचना पहा. कुकीजवरील अधिक माहिती http://www.allaboutcookies.org/ वर उपलब्ध आहे आणि तुम्ही येथे स्वारस्य-आधारित जाहिरातींसाठी कुकीजच्या वापराबद्दल जाणून घेऊ शकता: www.youronlinechoices.com किंवा http://optout.networkadvertising.org/?c=1.

भविष्यात आमच्या कुकीज हटवून किंवा अकार्यान्वित करून तुम्ही आमच्या वेबसाईटच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये किंवा वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुम्ही कुकीज हटविल्यास, नवीन ब्राऊझर इंस्टॉल केल्यास किंवा नवीन संगणक घेतल्यास, या साईटवर परत आल्यावर ऑप्ट-आउट कुकी रीसेट करणे आवश्यक आहे.

आम्ही कुकीजच्या खालील श्रेणी वापरतो:

अनिवार्यपणे आवश्यक कुकीज

वेबसाईट कार्यरत असण्यासाठी या कुकीज आवश्यक आहेत आणि आमच्या सिस्टिममध्ये त्या बंद केल्या जाऊ शकत नाहीत. त्या सामान्यपणे तुमची गोपनीयता प्राधान्ये सेट करणे, लॉग इन करणे किंवा फॉर्ममध्ये भरणे अशा तुम्ही केलेल्या कृतींच्या केवळ प्रतिसादासाठी म्हणून सेट केल्या जातात.

या कुकीजना ब्लॉक करण्यासाठी किंवा तुम्हाला त्याबाबत अलर्ट करण्यासाठी तुम्ही तुमचा ब्राऊझर सेट करू शकता, परंतु साईटचे काही भाग त्यानंतर कार्य करणार नाहीत. या कुकीज कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती स्टोअर करत नाहीत.

परफॉर्मन्स कुकीज

या कुकीज आम्हाला भेटी आणि ट्रॅफिकच्या स्त्रोतांचे मापन करण्याची अनुमती देतात जेणेकरून आम्ही आमच्या साईटच्या कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन करून सुधारू शकू. कोणते पेजेस सर्वाधिक आणि सर्वात कमी लोकप्रिय आहेत आणि व्हिजिटर्स साईटवर कसे फिरतात हे जाणून घेण्यात त्या आम्हाला मदत करतात.

या कुकीजनी संकलित केलेली सर्व माहिती ही समुच्चित केलेली आहे आणि म्हणूनच अनामित आहे. तुम्ही या कुकीजना अनुमती न दिल्यास, आमच्या साईटला तुम्ही कधी भेट दिली हे आम्हाला कळणार नाही आणि आम्ही तिच्या कार्यप्रदर्शनाचे परीक्षण करू शकणार नाही. अशा कुकीजमध्ये Google Analytics द्वारे पुरविलेल्या तृतीय-पक्ष कुकीजचा समावेश असू शकतो.

फंक्शनल कुकीज

या कुकीज वेबसाईटला वर्धित कार्यक्षमता आणि वैयक्तिकरण पुरविण्यास सक्षम करतात. त्या आमच्याद्वारे किंवा ज्यांच्या सेवा आम्ही आमच्या पेजेसवर जोडल्या आहेत, त्या तृतीय-पक्ष प्रदात्यांद्वारे सेट केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, व्हिडिओ पाहणे किंवा ब्लॉगवर टिप्पणी करणे यांसारख्या, तुम्ही विनंती केलेल्या सेवा पुरविण्यात मदत व्हावी म्हणून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. या कुकीज गोळा करत असलेली माहिती निनावी असू शकते आणि त्या इतर वेबसाईट्सवरील तुमची ब्राऊझिंग ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकत नाहीत.

जर तुम्ही या कुकीजना परवानगी दिली नाही, तर यांपैकी काही किंवा सर्व सेवा योग्यप्रकारे कार्य करणार नाहीत.

बालकांद्वारे या साईटचा वापर आणि बालकांचा डेटा

आम्ही बालकांच्या गोपनीयतेबद्दल संवेदनशील आहोत. आमची वेबसाईट 13 वर्षाखालील मुलांसाठी विकसित केलेली किंवा त्यांच्यासाठी निर्देशित केलेली नाही. आम्ही स्पष्टपणे विनंती करतो की बालकांनी आमच्या वेबसाईटद्वारे स्वतःबद्दलची माहिती देऊ नये. तुमच्या अपत्याने अशा प्रकारची माहिती दिली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास आणि आमच्या डेटाबेसमधून ती हटवायची असेल, तर तुम्ही आमच्याशी DPO@choreograph.com वर संपर्क साधू शकता. आम्ही 13 वर्षांखालील मुलाबद्दल माहिती गोळा केल्याचे जाणवल्यास, आम्ही ती हटवू.

थर्ड पार्टी साईट्सच्या लिंक्स

आमच्या वेबसाईटवर दुसऱ्या वेबसाइटची लिंक असणे हे आमच्या संलग्न उत्पादनांचे किंवा वेबसाइट्सचे समर्थन असल्याचे सूचित करत नाही आणि ज्या थर्ड पार्टी वेबसाईटला आमची लिंक करतो, त्यांवर आम्ही नियंत्रण ठेवत नाही किंवा त्यांच्या कंटेंट किंवा गोपनीयता धोरणांची जबाबदारी घेत नाही. तुम्ही दुसऱ्या वेबसाईटच्या लिंकवरून पुढे गेल्यावर, त्यानंतर Choreograph ची गोपनीयता सूचना लागू असणार नाही. तुम्ही भेट देत असलेल्या कोणत्याही वेबसाईटचे गोपनीयता धोरण नेहमीकज वाचणे हे महत्त्वपूर्ण आहे.